चौफेर न्यूज – महात्मा ज्योतिराव फुले शिक्षण संस्था ठाणे संचलित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा आमळी तालुका साक्री जिल्हा धुळे या शाळेस नुकतेच आयएसओ नामांकन प्राप्त झाले आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय धुळे येथील माननीय प्रकल्पाधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे मॅडम, महात्मा ज्योतिराव फुले शिक्षण संस्था ठाणे चे अध्यक्ष कर्मभूषण बापूसाहेब डी के माळी, सचिव माननीय राजेश माळी.
प्रकल्प कार्यालयाचे सहायक प्रकल्प अधिकारी (प्रशासन) माननीय श्री नवनाथ जानकर साहेब, सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण विभागाचे माननीय श्री पि.के ठाकरे साहेब, श्री विजय भडगावकर साहेब, श्री आव्हाड साहेब व प्रकल्प कार्यालयाचे समन्वयक श्री विजय खैरनार सर शासकीय आश्रम शाळा राईनपाडा यांनी अत्यंत अमुल्य मार्गदर्शन केले.
या शाळेत विद्यार्थी हितासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा पुरवल्या जातात शाळेत वर्षभर विविध शैक्षणिक, कलात्मक, क्रिडाविषयक, उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो.
संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांच्या योगदानातून शाळेत भव्य इमारतीचे निर्माण झाले असून भौतिक सोयी सुविधा व विद्यार्थ्यांच्या हिताच्या सर्वच बाबींचे परिपूर्ण पूर्तता केली जाते. शासन अनुदान वगळता संस्थेमार्फत मोठ्या प्रमाणात भरीव आर्थिक मदत प्राप्त होते. ज्याद्वारे शाळेचे नंदनवन कसे होईल याची काळजी घेतली जाते माझी शाळा माझा अभिमान व माझी शाळा सुंदर शाळा हाच ध्यास सर्व कर्मचारी सतत राबवतात.
आमळी आश्रम शाळाने क्रीडा स्पर्धेत राज्यस्तरावर आपले नाव कोरलेले आहे. या शाळेत नेहमी नवनवीन उपक्रम राबवले जातात. शाळेतील प्रत्येक विद्यार्थी व पालक शाळेविषयी दर्जेदार शिक्षणाविषयी नियमित समाधानी असतो.
शाळेला आयएसओ नामांकन मिळावे अशी संस्था व शालेय कर्मचाऱ्यांची नेहमीच तळमळ होती त्यासाठी राईनपाडा आश्रम शाळेचे आदर्श शिक्षक श्री विजय खैरनार सर हे नामांकन प्राप्तीसाठी सदैव मदत करीत होते. त्यांच्या अमूल्य मार्गदर्शन व प्रेरणेने हा सदर नामांकन प्राप्त झाले आहे. आमळी गावातून राष्ट्रीय दर्जाचे मानांकन मिळाल्यामुळे आमळी गावाच्या सरपंच श्रीमती हिनाताई भीमराव बोरसे यांनी अत्यंत समाधान व्यक्त केले आहे. कृषिभूषण श्री भिमराव बोरसे यांनी देखील अभिनंदन केले आहे.
आश्रम शाळेचे माध्यमिक मुख्याध्यापक श्री युवराज चव्हाण सर, प्राथमिक मुख्याध्यापिका श्रीमती नलिनी पाटील व शाळेतील सर्व प्राथमिक माध्यमिक शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी आयएसओ नामांकन प्राप्तीसाठी मेहनत घेतली सदर मानांकन प्राप्तीचे संस्था अध्यक्ष, सचिव, ग्रामस्थ,व पालक यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.