आज दि. 9/7/2022 वार शनिवार रोजी प्रचिती पब्लिक स्कूल येथे आषाढी एकादशी कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. आजच्या दिवसाचे विशेष महत्व म्हणजे आषाढी शुद्ध एकादशी निमित्त नामाचा गजर करत प्रचिती पब्लिक स्कूल चे सर्व विद्यार्थी शिक्षक व भजन मंडळी समवेत वारी/दिंडी काढण्यात आली. सर्व विद्यार्थी उत्साहपुर्ण सहभाग घेवून विठ्ठल रूक्मिणीची पालखी घेऊन शाळेच्या नव्या वास्तुकडे मार्गस्थ झाले. तसेच विठ्ठलाच्या नामाचा गजर करत त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्न भाव दिसुन आला. दरवर्षाप्रमाणे हि वारी उत्साहाने साजरी करण्यात आली. वरीसाठी सामोड्याचे भजनी मंडळ उपस्थित होते. त्यांनी सुंदर भजने प्रस्तुत केली. तसेच त्यांच्या भजनाच्या तालावर विद्यार्थीनींनी व शिक्षकवृंदाने ताल धरला. शाळेचे विद्यार्थी विठ्ठल रू्क्मिीणी व वारकरी नववार साडी परीधान करून व तुळशी वृंदावन डोक्यावर धरून या रूपात सुंदर दिसत होते. कार्यक्रमासाठी विठ्ठलाचा देखावा तयार करण्यात आला होता. विठ्ठलाची आकर्षक अशी रांगोळी काढण्यात आली होती. फलक लेखन सुंदर रीतीने रेखाटण्यात आले होते. आषाढी एकादशी कार्यक्रमानिमित्त शाळेचे समन्वयक श्री. राहुल पाटील सर उपस्थित होते व त्यांचे योग्य मार्गदर्शन कार्यक्रमास लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किरण देवरे यांनी केले. आषाढी एकादशीचे महत्व सोनल खरोटे यांनी सांगितले. विठ्ठल विठ्ठल या गाण्यावर शाळेच्या विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले. इयत्ता सहावीच्या विद्यार्थीनींनी संतवाणी गायली. अशा रीतीने विविध सांस्कृतीक कार्यक्रमांची प्रस्तुती करण्यात आली. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा अनमोल सहभाग लाभला. कार्यक्रमाची सांगता सुरूची भोजनाने झाली.