पिंपरी (दि. 24 नोव्हेंबर 2016) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा कार्यकर्ते परशूराम (आबा) गुंजाळ यांनी आज गुरुवारी कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला. पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन साठे यांनी चापेकर चौक यथील पक्ष कार्यालयात गुंजाळ व इतर पन्नास युवा कार्यकर्त्यांचे पुष्पगुच्छ देऊन कॉंग्रस मध्ये स्वागत केले.
परशूराम गुंजाळ यांनी 2012 च्या सार्वत्रिक निवडणूकीत वॉड क्र. 49 (थेरगाव वाकड) मधून मनसेची उमेदवारी घेऊन तिस-या क्रमांकाची मते मिळविली होती. यावेळी सेवादलाचे शहराध्यक्ष संग्राम तावडे, मावळ युवा अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, शहर सरचिटणीस ॲड. क्षितीज गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस चिंतामणी सोंडकर, चिंचवड विधानसभा युवा अध्यक्ष मयुर जैस्वाल, एनएसयुआयचे माजी प्रदेशाध्यक्ष मनोज कांबळे, अॅड. सरचिटणीस अनिरुध्द कांबळे, कुंदन कसबे, मकरध्वज यादव, कमला तोलनुरे आदी उपस्थित होते.
गुंजाळ यांच्या बरोबर राजूशेठ मिसाळ, विजूशेठ हेगडे, रुपेश चौधरी, राज गुंजाळ, शेरखान पठाण, हमिदभाई शेख, मनसे (वाकड) विभाग प्रमुख बाबर शेख, चेतन विटकर, फरीना शेख, किरण विटकर, एनसीपीचे जावेद शेख, संजय मुंडावडे, सोहेल अन्सारी, अजय कोरडेकर, राजशेखर हिरेमठ आदींनी कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला.