चौफेर न्यूज – दगडू शेठ हलवाईची सुंदर अशी मुर्ती स्थापित करण्यात आली. शाळेचे समन्वयक श्री. राहूल अहिरे व सौ. भारती अहिरे यांच्या हस्ते गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली. शाळेच्या शिक्षीकांनी रोज एक अशा प्रकारे अष्टविनायक गणपतीची माहीती विद्यार्थ्यांना सांगुन जनू काही दर्शनच घडविले होते. शिक्षीका माधुरी शिंदे यांनी मयुरेश्वर गणपतीची, अनुष्का धामणे यांनी चिंतामणी गणपती, काजल राजपूत यांनी सिद्धीविनायक, किरण देवरे यांनी महागणपती, हेतल राजपूत यांनी विघ्नहर, अर्चना देसले यांनी बल्लाळेश्वर, सरिता खैरनार यांनी गिरिजात्मक तसेच अश्विनी सुर्यवंशी यांनी वरदविनायक गणपती बाप्पाची माहिती सांगीतली.
शाळेत नऊ दिवसासाठी गणपती बाप्पा स्थापित होते यावेळी रोज एक एक असे प्रत्येक वर्गाने बाप्पाची मनोभावे आरती केली. सातव्या दिवशी शाळेच्या मुख्याध्यापीका सौ. अनिता पाटील व श्री. श्रीकांत पाटील यांनी सत्यनारायण पुजा व प्रसाद केला. तसेच सत्यनारायण प्रसादासाठी शाळेचे संस्थापक श्री. प्रशांत भिमराव पाटील उपस्थीत होते. त्यांनी या प्रसंगी गणपती बाप्पाची मनोभावे आरती केली.
गणपती बाप्पाच्या विसर्जन सोहळ्यात शाळेतील विद्यार्थीनी बाप्पाचे गाणे, डांस व स्तोत्र पठन करून सर्वांचे मनोरंजन केले. तसेच गणपती बाप्पाचे विसर्जन राहूल अहिरे सरांच्या हस्ते करण्यात आले. विसर्जनासाठी शाळेच्या मुख्याध्यापीका अनिता पाटील, अर्चना देसले, किरण देवरे, अनुष्का धामणे, काजल राजपूत, सरिता खैरनार, सुनिता जाधव, अश्विनी सुर्यवंशी, हेतल राजपूत या शिक्षीका हजर होत्या.
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या !