चौफेर न्यूज – प्रचिती इंटरनॅशनल स्कूल मध्ये नवरात्रीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी विद्येची देवता सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन शाळेच्या प्राचार्या सौ. भारती पंजाबी,, मॅडम, सौ वैशाली लाडे मॅडम ,व्यवस्थापक श्री. वैभव सोनवणे सर श्री. तुषार देवरे सर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी इयत्ता नववीच्या नेहा पाटील या विद्यार्थिनीने देवीच्या नव रूपांची माहिती देताना सांगितले की शारदीय नवरात्र हा देवी दुर्गा मातेच्या स्मरणार्थ साजरा केला जाणारा एक हिंदू सण होय . नवरात्र म्हणजे नवरात्रीचा समूह दुर्गादेवीची उग्र व सौम्य अशी दोन रूपे आपणास पाहायला मिळतात. उमा, पार्वती, जगदंबा भवानी ही देवीची सौम्य रुपे आहेत़. दुर्गा चंडी, चामुंडा ही देवीची उग्ररूपे आहेत .प्रथम शैलपुत्री , द्वितीय ब्रह्म चारिणी, तृतीय चंद्र घंटा, चतुर्थ कृष्ण मांडा ,पंचम स्कंदमाता, षष्ठम कात्यायनी, सप्तम काल रात्री, अष्टम महागौरी ,नवम सिद्धी रात्री अशी देवीची नऊ रूपे आहेत .नवरात्रीच्या पहिल्या माळेला म्हणजेच पहिल्या दिवशी पांढरा रंगाचे वस्त्र परिधान केले जातात. दुर्गा देवीचे प्रथम रूप म्हणजे शेलपुत्री आहे .शैलपुत्री पर्वतराज हिमालयाची कन्या आहे. देवीची पूजा पांढऱ्या रंगाच्या फुलांनी केली जाते पांढऱ्या रंगाचे वस्त्र अर्पण करणे शुभ मानले जाते. शैल म्हणजे पाषाण आणि पाषाणाप्रमाणे ठाम प्रेरणा यातून मिळते . देवीचे द्वितीय स्वरूप म्हणजे ब्रह्मचारिणी या देवीच्या पूजनाने सुख ,शांतता ,समृद्धता आणि धर्म प्राप्त होते .या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान केले जातात .दुर्गा देवीचे तिसरे रूप चंद्रघंटा आहे .चंद्र घंटा देवीने ललाटावर चंद्र धारण केला आहे. भूतलावर धर्माचे रक्षण करण्यासाठी देवीचा अवतार झाला होता .या दिवशी निळ्या रंगाचे वर्ष परिधान केले जातात. दुर्गा देवीचे चौथे रूप कुशमांडा आहे. ब्रम्हांडाची निर्मिती केल्यामुळे या रूपाला कुशमांडा असे संबोधले जाते. या देवीची उपासना मनुष्याला रोगापासून दूर करते अशी मान्यता आहे .या देवीला पिवळा रंग प्रिय आहे.. म्हणून या दिवशी पिवळ्या रंगाची वस्त्र धारण केली जातात. दुर्गा देवीचे पाचवे रूप म्हणजे स्कंदमाता आहे. कार्तिके म्हणजे भगवान शंकर व माता-पार्वती यांचे पुत्र होय . स्कंद मातेचे व्रत मुलांना दीर्घायुष्य देण्यासाठी केले जाते .देवीला हिरवा रंग प्रिय आहे. देवीचे सहावे रूप म्हणजे कात्यायनी आहे . या देवीच्या पूजनाने धर्म अर्थ काम आणि मोक्षाची प्राप्ती होते .. देवीचा अवतार धारण करण्यामागील मुख्य उद्देश धर्माची पुनर स्थापना संरक्षण असल्याचे म्हटले जाते. देवीला भुरारंग प्रिय आहे . देवीचे सातवे रूप काल रात्री आहे . काल रात्रीचे रूप भयंकर आहे . या देवीचे पूजन केल्याने कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवत नाही. देवीला नारंगी रंग प्रिय आहे .देवीचे आठवे रूप महागौरी आहे. राक्षस शुंभनिशुंभाचा वध करण्यासाठी महागौरीने कौशिकी स्वरूप धारण केले धारण केले होते व त्यांचा वध केला. या देवीला मोरपंखी रंगप्रिय आहे. देवीचे नववे रूप सिद्धीदात्री आहे. या देवीच्या पूजनाने मोक्ष प्राप्त होतो. देवीला गुलाबी रंग प्रिय आहे. अशी माहिती सर्व विद्यार्थ्यांना दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवीच्या यशिका भामरे व निखिल काकुस्ते या विद्यार्थ्यांनी केली .याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या सौ .भारती पंजाबी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना जीवनामध्ये लोभ ,मोह, काम, क्रोध भ्रष्टाचार, मत्सर इत्यादी अवगुणांचा त्याग करावा व सत्य बोलावे व आपले जीवन आदर्श बनवावे असे मार्गदर्शन केले .याप्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी गरबा नृत्याचे प्रदर्शन केले. या कार्यक्रमासाठी सुंदर फलक लेखन करण्यात आले .या प्रसंगी शाळेत प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी सरस्वतीचे रेखाटन केले.