चौफेर न्यूज – मुंबई – पंजाबसह महाराष्ट्राने प्रथम क्रमांक मिळवला आहे. केंद्र शासनाच्या श्रेणीत्मक कामगिरी निर्देशांकात महाराष्ट्राने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये एकूण १००० पैकी ९२८ गुणांसह थेट पहिल्या श्रेणीत केरळ, शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या तुलनेत राज्याने आठव्या क्रमांकावरून ही झेप घेतली आहे. शिवाय २०१९ च्या तुलनेत २०२०-२१ मध्ये ५९ गुणांची वाढ झाल्याचे समोर आले आहे.
शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी राज्य, केंद्रशासित प्रदेशांची कामगिरी एकसमान प्रमाणात मोजण्यासाठी या निर्देशांकाची मदत होते.
या निर्देशांकानुसार दुसऱ्या श्रेणीत आंध्र प्रदेश, गुजरात, चंडीगड, केरळ, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान या ७ राज्यांचा समावेश आहे. ही राज्ये १००० पैकी ८५१ ते ९०० च्या दरम्यान गुणांकन मिळविण्यात यशस्वी झाली आहेत.
तिसऱ्या श्रेणीत १२ राज्यांनी स्थान मिळविले आहे, तर चौथ्या श्रेणीत ६, पाचव्यात ५६, सहाव्यात ४ राज्यांनी स्थान मिळवले आहे.

कशी ठरवली जाते श्रेणी?
शिक्षण विभागाचा दर्जा, प्रवेश क्षमता, आवश्यक सुविधा आणि पायाभूत सुविधा, प्रशासन प्रक्रिया, इक्विटी या निकषांवर मानव संसाधन विकास विभागाने हा निर्देशांक सारांश अहवाल जाहीर केला आहे.
























