चौफेर न्यूज – शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी खेळाचे खूप महत्त्व आहे. खेळ खेळल्याने मनुष्यात धैर्य, सहनशीलता आणि मानवी गुणांचा विकास होतो. खास करून विद्यार्थ्यांच्या जीवनात खेळाचे महत्व भरपूर आहे म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला दिवसातून थोडा वेळ काढून खेळायला हवे खेळ खेळल्याने तंदुरुस्तीसोबत मनोरंजनही होते. कोणताही खेळ खेळल्याने व्यक्तीचा शारीरिक विकासा सोबत मानसिक विकासही होतो. खेळताना डोळे, मेंदू व शरीराच्या प्रत्येक अवयवाचा वापर करावा लागतो. खेळामुळे शरीराचे संतुलनही वाढते. नियमित कोणतातरी खेळ खेळल्याने चित्त प्रसन्न राहते. मनात उल्हास आणि उत्साह वाढून आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात यश मिळते. प्रचिती इंटरनॅशनल स्कूल विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नेहमीच कटीबद्ध राहते मग विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास असो किंवा मानसिक विकास असो किंवा बौद्धिक विकास असो प्रचिती स्कूल नेहमी अग्रेसर असते त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन स्कूलमध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.प्रशांत पाटील साहेब यांच्या सहकार्याने व प्रेरणेने केले जाते.
चांगला गुरु तुमच्यासाठी यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो. परंतु त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःला चालावे लागते. उमेद, विश्वास व कष्ट ज्याच्या जवळ आहे ते कधीच अपयशी होऊ शकत नाही, असा खेळाडूंमध्ये आत्मविश्वास मा.श्री. प्रशांत पाटील साहेब नेहमी जागवतात.
विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास होण्यासाठी विविध इनडोअर तसेच आऊटडोअर खेळांचे प्रशिक्षण शाळेत दिले जाते.
केवळ प्रशिक्षणच दिले जाते असे नाही तर वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांची प्रगती ही तपासली जाते. त्यामुळे दि. १४ नोव्हें २०२२ रोजी तालुकास्तरीय पावसाळी शालेय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन कुस्ती आणि बुद्धिबळ या स्पर्धांद्वारे प्रचिती इंटरनॅशनल स्कूल मध्ये तालुका संयोजन समितीचे अध्यक्ष मा. श्री संजय भामरे, प्राचार्या भारती पंजाबी, समन्वयक श्री वैभव सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी तालुका संयोजन समितीचे सर्व सदस्य तसेच उपप्राचार्या वैशाली लाडे, समन्वयक व क्रीडा शिक्षक श्री वैभव सोनवणे व तुषार देवरे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
तालुक्यातील विविध शाळांमध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा झाल्या. त्यामध्ये प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विजयाचा झेंडा जिल्हास्तरावर रोवला. त्यामध्ये काही इनडोअर तसेच आउटडोर खेळांचा समावेश आहे.
बुद्धिबळ (विभागासाठी निवड.)
- रोशन सुनील पाटील (वयोगट 14 आतील) 2. चैतन्य सुनील पाटील( वयोगट 19 आतील )
जुडो
- करण विनोद सूर्यवंशी (वयोगट 19आतील ).
2.प्रेक्षा दीपक पवार (वयोगट 17 आतील.)
योगा
1) सम्यक राजेंद्र कांकरिया( वयोगट 17 आतील)
2) देवांशू किशोर देवरे (वयोगट 17 आतील).
3) यथार्थ सतीश पाटील (वयोगट 14 आतील)
मैदानी स्पर्धेत जिल्हास्तर.
*100 मीटर धावणे
1) प्रतीक सुनील देवरे (वयोगट 17 आतील).
2) आर्या भूषण सोनवणे (वयोगट 14 आतील)
क्रिकेट (14 वयोगटातील)
1) आदित्य राकेश बच्छाव 2) प्रतीक संदीप भामरे 3) लक्ष मंजीत पोपली 4) विनीत विनोद देवरे 5) वीर मनीष पंजाबी. 6) शार्दुल प्रमोद भदाणे 7) सिद्धांत संदीप पाटील. 8) असीम अजित पटवे 9) भावेश दिलीप रामोळे. 10) मंथन विकास मगाडे. 11) स्पर्श रवींद्र खैरनार 12) प्रणय प्रफुल्ल नेरे 13) मधुर योगेश शेवाळे.
कबड्डी स्पर्धा. (विभाग स्तर) ( 14 वर्षा आतील मुली.)
1) दिव्या प्रशांत देसले
2) आर्या भूषण सोनवणे
3) अविका छोटूलाल ठेलारी
4) जानवी गुलाबराव दाभाडे
5) धनश्री समीर देसले
6) निकिता सचिन देसले
7) भूमिका भास्कर देवरे
8) युगंधरा जितेंद्र ठाकरे
9) रसिका मनोज चालसे
10) रुचिका संदीप खैरनार
11) रोशनी हितेंद्र ठाकरे
12) सायना अमीन शहा
या सर्व विद्यार्थ्यांनी प्रचितीच्या विजयाचा इतिहास साक्री तालुक्यात नोंदवला.
इनडोअर खेळ असो की आउटडोर, खेळ आपल्या शरीराला स्वस्थ आणि मनाला प्रसन्न करतात. खेळ व्यक्तीचा व्यक्तिमत्व विकास करतात. एकमेकांमध्ये सहकार्य, बंधुता वाढवतात. खेळांमुळे परंपरा, सन्मान आणि प्रेम देखील वाढते. अशा पद्धतीने खेळ आपल्याला गुणवान, चारित्र्यवान आणि एक खरा व्यक्ती बनवतात. म्हणून प्रचिती स्कूल विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबरच खेळांना महत्त्व देते.
विद्यार्थ्यांचे व श्री वैभव सोनवणे यांचे त्यांनी घेतलेल्या मेहनती बद्दल मा. श्री प्रशांत पाटील साहेब, प्राचार्या भारती पंजाबी उपप्राचार्या वैशाली लाडे, समन्वयक श्री तुषार देवरे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.