चौफेर न्यूज – प्रचिती पब्लिक स्कूल, पिंपळनेर येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
स्त्रिांयाचे जीवनी होता अज्ञानाचा अंधार,
क्रांती ज्यो तुम्ही दाविला ज्ञानाचा प्रकाश,
स्त्री शिक्षणाची जेत पेटवून केला उध्दार
झेप घेण उंच खुले करून दिले आकाश !!
आजच्या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता पाटील मॅडम उपस्थित होत. कार्यक्रमासाठी सुंदर असे फलक लेखन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनुष्का धामणे मॅडमांनी केले. सावित्रीबाई यांच्या जयंती निमित्त अधिक महिती किरण देवरे मॅडम यांनी सांगितली.
कार्यक्रमाची सुरूवात सरस्वती व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पुजनाने झाली. सावित्रीबाई फुले या मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत. सावित्रीबाईंनी स्वतःच म्हणजे स्वकर्तुत्त्वाने आपले समाज सुधारण्याच्या क्षेत्रामध्ये वेगळे स्थान निर्माण केले. स्त्रिांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. सावित्रीबाई फुले उत्तम लेखिका कवित्री सुध्दा होत. सावित्रीबाई फुले विषयी माहिती शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थीनींनी सांगितली.
कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने केली. कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.