मुंबई: एका इमारतीच्या २३ व्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली असून मुंबईतील विक्रोळी भागात ही घटना घडली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला. अनेक जण या इमारतीत अडकल्याची भिती व्यक्त होत आहे. या दुर्घटनेनंतर अग्निशमन दल आणि पोलीस पोहोचले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून लिफ्टमध्ये अडकलेल्यांसाठी बचाव कार्य सुरू आहे. या घटनेने इमारत परिसरात खळबळ उडाली आहे.