चौफेर न्यूज – प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या सौ भारतीय पंजाबी मॅम यांना नियोजनपूर्वक प्रशासनाबद्दल उत्कृष्ट मुख्याध्यापिका पुरस्काराने सन्मानित केल्यामुळे तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार श्री. तुषार देवरे सर ,श्री. धर्मराज अहिरे सर सौ. स्मिता नेरकर मॅम व सौ श्वेता सोनवणे मॅम यांना मिळाल्यामुळे शाळेच्या प्राचार्या सौ. वैशाली लाडे, व्यवस्थापक श्री. वैभव सोनवणे सर व शिक्षक वर्ग व कर्मचारी वर्गातर्फे त्यांचा सत्कार शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
या प्रसंगी शाळेच्या प्राचार्या भारती पंजाबी मॅडम यांनी हा पुरस्कार स्वीकारताना सांगितले की या पुरस्काराचे श्रेय त्यांनी संपूर्ण त्यांच्या कर्मचाऱ्यांना व विद्यार्थ्यांना आणि सगळ्या विद्यार्थी वर्ग शिक्षक वर्ग व पालक वर्ग यांना समर्पित केला. कारण कर्मचाऱ्यांचे सहकार्य विद्यार्थ्यांची शिस्तप्रिय वागणे या सर्व गोष्टींची दखल घेऊन आणि प्राचार्यांचे नियोजनबद्ध कार्यक्रम या सर्व गोष्टींना नियोजित धरून आज हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे . म्हणून याचे सर्व श्रेय शाळेला दिले आणि शाळेला जो आदर्श शाळा म्हणून पुरस्कार मिळाला. प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी याची त्रिसूत्री सांगड घालून कार्य यशस्वीरित्या पार पाडले जात असते म्हणून याचे श्रेय शिक्षक व सर्व विद्यार्थी वर्गांना समर्पित केले. हा शाळेतील छोटासा गुणगौरव सत्कार सोहळा अतिशय उत्साहात आणि आनंदाने पार पडला.