चौफेर न्यूज – प्रचिती इंटरनॅशनल स्कूल ही विद्यार्थ्यांमधील सर्वोत्कृष्ट Talent search करणारी एक प्रयोगशाळा आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने प्रचिती नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांचे आयोजन करते. त्यामध्ये विविध विषयांमध्ये घेतली जाणारी Olympiad Exam. उल्लेखनीय आहे.
Olympiad Exam मुळे गुणवान आणि महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांमध्ये चुरस निर्माण होते.
SOF Olympiad Exam मध्ये विविध प्रकारचे टप्पे असतात. त्या प्रत्येक टप्प्यामध्ये प्रचिती शाळेतील विद्यार्थ्यांनी नेहमीच Gold Medal मिळवून प्रचिती दिली आहे.
English, Math, Science, GK, Social Science, Hindi या विषयांमध्ये Gold Medal मिळवले आहेत. विद्यार्थ्यांच्या या सर्व excellent performance मुळे प्रचिती शाळेला District Performance Excellence Award ने पुरस्कृत केले आहे. त्याचप्रमाणे शाळेच्या प्राचार्या भारती पंजाबी यांना Letter of Appreciation ने सन्मानित करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या यशामुळे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री प्रशांत पाटील यांनी अभिनंदन केले आणि पुढच्या परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.