आज दि. 21-6-2023 रोजी प्रचिती पब्लिक स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात आला.
योग डालता है, शरीर में नए प्राण
इसे अपनाकर करे नवयुग का निर्माण,
योग है जीवन जीने का ज्ञान
जिसके आगे है नतमस्तक विज्ञान
आजच्या या कार्यक्रमास शाळेचे समन्वयक राहुल पाटील सर, मुख्याध्यापिका अनिता पाटील मॅम, मुख्य अतिथी योगा प्रशिक्षक सौ. सुरेखा गुजराथी मॅम उपस्थित होत्या.
सुरेखा मॅम यांनी योगाचे दैनंदिन जीवनामध्ये काय महत्व आहे ते विद्यार्थ्यांना पटवून दिले. योगा केल्याने माणसाचे स्वास्थ चांगले राहते तसेच तन-मन शांत राहते. तसेच सुरेखा मॅम यांनी ॐकार पूर्ण करावा असे सांगितले.
तसेच सुरेखा मॅम यांनी विविध योग मुद्रांचे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांकडून योग मुद्रांचे प्रात्यक्षिक करून घेतले व शिक्षिकांनी देखील प्रात्यक्षिकामध्ये सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचाल आश्विनी पगार मॅम यांनी केले. कार्यक्रमासाठी सुंदर असे फललेखन करण्यात आहे. व सुंदर अशी रांगोळी रेखाटण्यात आली.
कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने केली गेली. कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.