चौफेर न्यूज – ICAI कडून आज CA November Result 2020 जाहीर झाला आहे. दरम्यान ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षा दिल्या आहेत त्यांना त्यांचे निकाल ICAI ची अधिकृत वेबसाईट icai.org वर ते पाहता येणार आहेत. यंदा सीए नोव्हेंबर परीक्षा 21 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर दरम्यान पार पडली आहे. फाऊंडेशन कोर्सची परीक्षा 8-14 डिसेंबर तर फायनल कोर्स परीक्षा 21 नोव्हेंबर ते 6 डिसेंबरच्या काळात पार पडली आहे. इंटरमेडिएट एक्झाम 22 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर या कालावधीमध्ये पार पडली आहे. आजच्या निकालासोबतच लेखी परीक्षेसोबत टॉप 50 यशस्वी विद्यार्थ्यांची ऑन इंडिया मेरीट लिस्ट देखील जाहीर होणार आहे.
icaiexam.icai.org या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
होमपेजवर CA November Result 2020 ची लिंक तुम्हांला दिसेल त्यावर क्लिक करा.
तुम्ही नव्या पेज वर रिडिरेक्ट व्हाल तेथे तुम्हांला लॉगिंग डिटेल्स टाकावे लागतील.
त्यानंतर तुमचा निकाल तुम्ही स्क्रिनवर पाहू शकाल.