चौफेर न्यूज – प्रचितीइंटरनॅशनल स्कूल मध्ये गोकुळाष्टमीनिमित्त दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला .याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या सौ .भारती पंजाबी मॅम व सौ.वैशाली लाडे मॅम तसेच व्यवस्थापक श्री वैभव सोनवणे सर व श्री तुषार देवरे सर व एक दिवसीय उपप्राचार्य श्री नितीन सर यांनी बाल कृष्णा ची तसेच श्री कृष्ण व राधा बनलेल्या विद्यार्थ्यांची पूजा केली .याप्रसंगी शाळेच्या शिक्षिका सौ सपना देवरे मॅडम मॅडम यांनी सूत्रसंचालन करताना गोकुळाष्टमी म्हणजे श्रीकृष्णाचा जन्मदिवस असून श्रीकृष्ण म्हणजे वीर पुरुषाचा कौस्तुभमणी ,यशस्वी ,मुत्सद्दी , विजयीयोद्धा ,धर्म साम्राज्याचाउत्पादक ,धर्माचा महान प्रचारक ,भक्तवत्सल भक्ताभिमानी , ज्ञानी यांची, जिज्ञासू ची इच्छा पूर्ण करणारा जगद्गुरु होय अशी महती विशद केली .तसेच शाळेच्या शिक्षिका वैशाली खैरनार यांनी गोकुळाष्टमी आपण का साजरी करतो याविषयी माहिती विशद करताना सांगितले की श्रीकृष्णाला दूध दही खूप आवडत असे .पशु मागे धावणे गवळणीच्या वाटा अडवून दूध-दही मागणे न दिल्यास दगड मारून माठ फोडणे .वासरांना मोकळे सोडून मनसोक्त दुग्धपान करू देणे .दूध दही गोकुळाच्या बाजारात विकायला नेण्यापूर्वी गवळ्याच्या पोरा सोरांना मन सोक्त खाऊपिऊ घालून गोपाळांना जमवून मनोरे तयार करून गोपिकांच्या घरातील दूध दही चोरून खाणे .अशा नाना परीचे क्रीडा ,कौतुके यामुळे थोरामोठ्यांच्या आनंदाला भरते येईल असे विशद केले .याप्रसंगी इयत्ता आठवी ,नववी व दहावी तील विद्यार्थ्यांनी अतिशय जल्लोषात मनोरे रचून दहीहंडी फोडली. व दहीकाल्याच्या प्रसादाचा व स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद लुटला .या कार्यक्रमासाठी सुंदर श्रीकृष्णाचीसुंदर सजावट करण्यात आली . या कार्यक्रमा च्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंद व इतर कर्मचारी वर्गाने सहकार्य केले.