संकल्प १००% लसीकरणयुक्त थेरगाव
थेरगाव सोशल फाऊंडेशन ने वारंवार पाठपुरावा करुन गणेशनगर येथील खिंवसरा शाळेत लसिकरण केंद्र सुरु केले व अवघ्या २ दिवसातच ६५० हुन अधिक नागरीकांचे लसीकरण करुन घेतले. * यात प्रामुख्याने गृहिणी,विद्यार्थी, पालकांचा व कामगार महिला यांचा सहभाग जास्त होता.
फाऊंडेशनने केलेल्या जनजागृती मुळे बर्याच तरुण मुलामुलींनी लसीचा पहिला डोस घेतला. थेरगाव सोशल फाऊंडेशन च्या उपक्रमाचे नागरिकांनी खूप कौतुक करत आभार मानले.
TSF ने याआधीही कोरोना काळात अनेक समाजउपयोगी कामे व उपक्रम घेतले.
आता मिशन १००% लसिकरणयुक्त थेरगाव या उपक्रमांतर्गत घरोघरी जाऊन नागरीकांना लसिकरणाबाबत जनजागृती तसेच लसिकरण घेण्यासाठी वेळ देण्यात आला. नागरीकांनीही नेहमी प्रमाणे TSF वर विश्वास दाखवत विक्रमी लसिकरण करुन घेतले. यामध्ये पिंपरी चिंचवड मनपाच्या खिंवसरा पाटील हॅास्पिटल चा स्टाफ तसेच गणेश नगर येथील खिंवसरा पाटिल शाळेचे मुख्याध्यापक श्री. नटराज जगताप सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
लवकरच पुढील आठवड्याचे नियोजन करुन येणाऱ्या शनिवार व रविवारी परत लसिकरण मोहिमेचे आयोजन करणार आहोत..