चौफेर न्यूज – शिक्षण हे एकमेव उन्नतीचे साधन आहे असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. पण कोरोना या जागतिक संकटामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी अस्वस्थता निर्माण झाली. विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. लॉकडाऊन होऊन शाळा बंद पडल्या. विद्यार्थ्यांचे शिक्षण संपूर्ण खंडित झाले. परंतु प्रचिती इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष मा. श्री प्रशांत पाटील साहेब यांना विद्यार्थ्यांचे भविष्याची चिंता सतावत होती.त्यांनी प्राचार्या भारती पंजाबी, वैशाली लाडे, समन्वयक वैभव सोनवणे, तुषार देवरे तसेच सर्व शिक्षकांशी चर्चा केली आणि ऑनलाइन शिक्षण प्रचिती स्कूल मध्ये सुरू केले. परंतु ग्रामीण भागामध्ये रेंजची समस्या होती. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी व शहरी भागातील विद्यार्थी यांच्यामध्ये शिक्षणाची एक पुसटशी रेषा निर्माण झाली. मुलांच्या हातात मोबाईल आला. त्यामुळे त्यांचे अभ्यासावरचे लक्ष उडाले, विद्यार्थी बेशिस्त झाले, पालकांचे ऐकेनासे झाले, कॉन्सन्ट्रेशन कमी झाले, त्यांच्या अभ्यासात एक दरी निर्माण झाली.
त्यांच्या अभ्यासाच्या सवयी पूर्ववत व्हाव्यात म्हणून प्रचिती स्कूलने अभ्यासाच्या सोप्या पद्धती या विषयावर श्री समर्थ सिंग पाटील यांचे व्याख्यान व कार्यशाळेचे नियोजन केले. प्रचिती स्कूल विद्यार्थ्यांना पायाने नाही तर डोक्याने चालायला शिकवते. समर्थ सिंग पाटील हे Maths Memory Trainer तसेच AV, अबॅकस तसेच वैदिक गणित या ISO प्रमाणित संस्थेचे संचालक आहेत.आज दिनांक 26 नोव्हेंबर 2022 रोजी कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. ही कार्यशाळा २६ ते ३० नोव्हेंबर पर्यंत आहे.यामध्ये पालकांनाही बसण्याची परवानगी आहे. यात अभ्यास करण्याच्या विविध सोप्या कलृत्या शिकविल्या तसेच अबॅकस, वैदिक गणित सोप्या पद्धतीने शिकवले. तसेच गणिताचे पाढे अगदी सहज कसे तयार करायचे याचेही मार्गदर्शन केले. विद्यार्थी या कार्यशाळेत मोठ्या उत्साहाने सहभागी झालेत.