पिंपरी : बालदिनाच्या निमित्ताने सायन्स पार्क आणि भावसार व्हिजन यांच्या संयुक्त विद्यमाने ”स्वच्छता अभियान” आणि ”स्मार्ट सिटी” या विषयावर आधारित घेतलेल्या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सायन्स पार्कमध्ये झालेल्या या स्पर्धेत प्राधिकरण आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील विविध शाळांमधून 150 विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच यावेळी भावसार व्हिजनचे अध्यक्ष संजय जवळकर, सचिव गणेश जवळकर, एरिया 105 चे गव्हर्नर संजय फुटाणे, सायन्स पार्कचे नंदकुमार कासार आदी उपस्थित होते.
या स्पर्धमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी आणि बारावी अशा गटातून प्रत्येकी पिंपरी-चिंचवड शहराच्या दृष्टीने स्वच्छता अभियान” आणि तिसऱ्या गटासाठी ”स्मार्ट सिटीबाबत माझ्या संकल्पना” असे विषय देण्यात आले होते. त्याप्रमाणे पहिल्या गटातून सपना श्रीवास्तव हिने इको-फ्रेंडली शहर या संकल्पनेतील चित्रातून प्रथम क्रमांक पटकावला तर ग्रीन सिटी संकल्पना मांडत मृण्मयी जगताप हिने द्वितीय आणि शौचालय आणि स्वच्छता हा विषय मांडत सपना नायकोडे हिने तृतीय क्रमांक मिळवला.
दुसऱ्या गटामध्ये आधुनिक पद्धतीची वाहतूक व्यवस्था, दिवे यांची संकल्पना मांडत प्रतिक महिंद्रकरने प्रथम क्रमांक मिळवला तर, साफसफाईची संकल्पना मांडून वरद दुर्गे याने द्वितीय आणि वृक्षारोपण, प्रदुषणविरहीत शहर अशा संकल्पनेतून परिणीता हंबर हिने तृतीय क्रमांक मिळवला. या स्पर्धांसाठी चित्रकला तज्ज्ञ विद्या हंबर यांनी परिक्षणाचे काम पाहिले. तर नगरसेवर निलेश पांढरकर यांनीही सदिच्छा भेट दिली.



















