पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा पट आता चांगलाच सजलाय. सर्वच राजकीय पक्षांनी डावपेच टाकारला सुरुवात केलीय. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता घालवण्यासाठी सर्वच विरोधक प्रयत्न करताहेत.. या सत्ता संघर्षात अनेक नेत्रांचं अस्तित्व पणाला लागलय..
पिंपरी चिंचवडच्या लढाईत सर्वाधिक प्रतिष्ठा पणाला लागलीय ती अजित पवार यांची. गेली 20 वर्ष शहरावर एक हाती वर्चस्व असलेल्या अजित पवार यांना त्यांच्याच चेल्याकडून कडवं आव्हान निर्माण झालं आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत अजित पवार यांचा शब्द पिंपरी चिंचवडमधे प्रमाण मानला जायचा. पण आता परिस्थिती बदललेली आहे. अनेक शिलेदारांनी त्यांची साथ सोडत त्यांना कडवे आव्हान निर्माण केलंय. बारामती नंतरचा राष्ट्रवादीचा गड म्हणून पाहिल्या जात असलेल्या पिंपरी चिंचवडची सत्ता राखणे या साठीच अजित पवार यांच्यासाठी महत्वाचं आहे.
मुंबईतली महापालिकेची सत्ता शिवसेनेच्या मुकुटातला शिरपेच आहे याच पद्धतीने राष्ट्रवादीसाठी पिंपरी चिंचवड मधली सत्ता प्रतिष्ठेची आहे. पिंपरी चिंचवडमधली सत्ता राष्ट्रवादीला गमवावी लागली तर अजित पवारांच्या नेतृत्वावरचं प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या काही महिण्यात नवी मुंबईमधे राष्ट्रवादीची महापालिकेची सत्ता राखण्यात गणेश नाईक यांना यश आले आणि त्यांचं शहरावरचे नेतृत्व माण्य झाले. केंद्र आणि राज्यातील सत्तांतर होऊन आता बराच कालावधी गेला आहे. यामुळं भाजपची हवा ही ओसरली आहे. अश्या स्थितीत ही जर अजित पवार रांना जर सत्ता राखता आली नाही तर त्यांची राजकीय कारकीर्द अडचणीत येणार आहे…!



















