नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गुरुवारी गुजरातमध्ये पोहोचले. येथे त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाची पहिली रणनिती जाहीर केली. केजरीवाल यांनी गुजरातमध्ये मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले आहे. अरविंद केजरीवाल म्हणाले सध्या महागाई खूप वाढली आहे. ही एक मोठी समस्या आहे. विजेच्या दरातही सातत्याने वाढ होत आहे. जसे आम्ही दिल्लीत मोफत वीज दिली. पंजाबमध्ये तीन महिन्यांत मोफत वीज देण्यात आली.
तसेच गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आल्यानंतर मोफत वीज देऊ. तसेच मी गुजरातमध्ये पहिली हमी म्हणून मोफत वीज देण्याचे वचन देतो, असे म्हणत त्यांनी भाजपला धडकी भरवायला सुरू केलं आहे. यावेळी केजरीवाल म्हणाले भाजपने 15 लाख देणार असल्याचे सांगितले होते. मग ही निवडणूक नौटंकी असल्याचे सांगितले. ते फक्त म्हणतात पण आम्ही हमी देतो. आम्ही काम केले नाही तर पुढच्या वेळी मतदान करू नका, असेही केजरीवाल यावेळी म्हणाले.