चौफेर न्यूज – गणिताविषयी बोलायचे झाले तर अनेक विद्यार्थ्यांना हा विषय आवडतो, तर अनेकांना त्याची भीती वाटते आणि ते या विषयाचा अभ्यास करणं टाळतात, असे विद्यार्थी गणिताकडे जास्त लक्ष देत नाहीत आणि इतर विषयांवर लक्ष केंद्रित करतात. गणित विषयाची भीती बाळगण्याची आणि टाळण्याची अनेक कारणे आहेत. विद्यार्थ्यांचे आवडते आणि नावडते विषय ठरलेले असतात. या गोष्टींचा पाठपुरावा केल्याने तुमच्यामध्ये गणिताविषयी गोडी निर्माण होईल.
- जर तुम्हाला गणित नीट समजून घ्यायचे असेल तर सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्याच्याशी संबंधित सर्व मूलभूत संकल्पना स्पष्ट करणे. ही बाब शिक्षक आणि विद्यार्थी दोघांसाठीही महत्त्वाची आहे. शिक्षकांनी अगदी सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांना मूलभूत संकल्पना स्पष्ट करत राहायला हव्यात. विद्यार्थ्यांनीही गणिताच्या मूलभूत गोष्टींकडे योग्य लक्ष दिल्यास त्यांना पुढील संकल्पना अधिक स्पष्टपणे समजू शकतील. यामुळे गणिताचा अभ्यास करणे खूप सोपे होईल.
- गणित हा एक असा विषय आहे ज्यामध्ये सर्व काही समजून घ्यावे लागते. नुसती घोकमपट्टी चालणार नाही. यामध्ये तुम्ही जितका चांगला सराव कराल तितके तुम्हाला सर्वकाही समजेल. गणितात चांगले गुण मिळवायचे असतील तर खूप सराव करावा लागेल. कोणतेही सूत्र लक्षात ठेवू नका, पेन आणि कागद घ्या आणि प्रश्नांसह त्याचा सराव करा. त्यामुळे गणिताचे प्रश्न सोडवण्याचा वेगही वाढेल.
- कोणताही चॅप्टर समजत नसेल तर तो सोडून पुढे जाण्याऐवजी त्यावर योग्य लक्ष केंद्रित करून सोडवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही त्रिकोणमितीचा अभ्यास करत असाल आणि त्याचे प्रश्न सोडवता येत नसतील, तर त्याला मध्येच सोडू नका. तो प्रश्न पूर्ण करण्यासाठी तुमच्या मित्रांची, पालकांची आणि शिक्षकांची मदत घ्या.