पिंपरी (Chupher News):- थेरगावात दत्तजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. खासदार श्रीरंग बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक निलेश बारणे, युवा सेना अधिकारी विश्वजित बारणे, सम्राट मित्र मंडळाने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
थेरगावातील हिरामण बारणे कॅालनीतील दत्त मंदिरात जयंती महोत्सवा निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले होते. चंपाष्टीपासून धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली होती. ह.भ.प निवृत्ती महाराज इंदलकर यांचे कीर्तन झाले. दत्त जयंतीदिवशी रामायणाचार्य ह.भ.प.संजय महाराज पाचपोर यांचे किर्तन झाले. रात्री अन्नदान झाले. दत्त जयंती महोत्सवाला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. दर वर्षी हा सोहळा होतो. गेल्या 20 वर्षांपासून सम्राट मित्र मंडळाच्या वतीने दत्त जयंती महोत्सवाचे आयोजन केले जाते.