नाना काटे सोशल फाऊंडेशन व एक्सप्रेस क्लिनिक यांचा उपक्रम
पिंपरी:- लोकनेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नाना काटे सोशल फाऊंडेशन व एक्सप्रेस क्लिनिक यांच्या वतीने आज दि.१२ रोजी महादेव मंदीर सभागृह पिंपळे सौदागर येथे परिसरातील नागरिकांसाठी मोफत न्युरोथेरेपी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरावेळी सांधेदुखी, पाठीच्या समस्या, ॲसिडीटी, मायग्रेन, पोटाच्या समस्या, नैराश्य, चिंता, ए.व्ही.एन. इत्यादी आजाराविषयीचा उपचार व मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिराचे उदघाटन माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक विठ्ठल ऊर्फ नाना काटे व नगरसेविका सौ. शितलताई नाना काटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवशंभो सेवा मंडळाचे संस्थापक ज्ञानेश्वर हांडे आणि शिवसेवा शंभो मंडळाचे अध्यक्ष संपत मेटे यांनी शरदचंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या दिर्घायुष्याचा शुभेच्छा दिल्या. एक्सप्रेस क्लिनिकचे डॉ. उमेश कदम यांनी न्यूरोथेरपी विषयी माहिती सांगितली.
यावेळी विठ्ठल रुक्मिणी वारकरी संस्थेचे अध्यक्ष गणेश काटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष उत्तम धनवटे, अर्जुन काटे, ज्ञानेश्वर काटे, हभप विलास काटे, दिलीप काटे, उद्योजक गोविंद काटे, शंकर काटे, शिवाजी काटे, संदिप जगताप,श्री. भुंडे, तसेच शिव शंभो सेवा मंडळाचे सभासद परिसरातील नागरिक, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.