(सिडनी) : आरोग्य व दीर्घायुष्यासाठी व्यायामाची गरज असतेच. मात्र, त्यासाठी जीममध्येच जाऊन घाम गाळावा असे काही नाही. ऑस्ट्रेलियातील सिडनी युनिव्हर्सिटीत झालेल्या एका संशोधनानुसार विविध प्रकारच्या घरगुती कामांनीही चांगला व्यायाम होऊ शकतो व त्यामुळे तंदुरुस्त होण्यास तसेच दीर्घायुष्यी बनण्यासही मदत मिळते.
घरामध्ये अनेक प्रकारची दैनंदिन कामे असतात. त्यामध्ये झाडलोट, फरशी पुसणे, कपडे धुणे, इस्त्री करणे, कुत्र्याला फिरवून आणणे किंवा स्वयंपाक करणे. अशा छोट्या-मोठ्या कामांमधूनही चांगला व्यायाम होत असतो. घरातील जीने चढताना केवळ तीनवेळा दम लागला तरी हा खेळ किंवा जीममधील व्यायामासारखाच प्रकार होतो. (housework) अशा घरगुती कामांमधील व्यायामामुळेही दीर्घायुष्यी होण्यास मदत मिळते.
कर्करोग, हार्टअॅटॅक व अन्य कोणत्याही गंभीर आजारांची जोखिम कमी करण्यासाठीही असा व्यायाम उपयुक्त ठरू शकतो. 87,500 पेक्षाही अधिक ब्रिटिश प्रौढांवर झालेल्या पाहणीतून ऑस्ट्रेलियाच्या संशोधकांनी याबाबतचे निष्कर्ष काढले आहेत. (housework) प्रमुख संशोधक इमॅन्युएल स्टॅमाटाकिस यांनी सांगितले की गती वाढवून केलेली दैनंदिन कामे अकरा मिनिटे केल्यावरही हार्टअॅटॅकचा धोका 65 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. तसेच कर्करोगाने मृत्यू येण्याचा धोकाही 49 टक्क्यांनी घटतो.