सुमित ज्ञानेश्वर नागरे, अपर्णा हरीश भोसले, सुनीता मनोज रामोळे, प्रेरणा कैलास वाघ यांची बिनविरोधी निवड
साक्री : साक्री नगरपंचायतीच्या बांधकाम सभापतीपदी सुमित ज्ञानेश्वर नागरे, स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य सभापतीपदी अपर्णा हरीश भोसले, महिला व बालकल्याण सभापतीपदी सुनीता मनोज रामोळे तर पाणीपुरवठा व जलनिस्सारण सभापतीपदी प्रेरणा कैलास वाघ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
साक्री नगरपंचायत विषय समितीच्या विद्यमान सभापतींचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर नवीन सभापती पदाची निवड येथील नगरपंचायत कार्यालयातील सभागृहात करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार संदीप भोसले व मुख्याधिकारी डॉ. मयूर पाटील, नगराध्यक्षा सोनल नागरे यांच्या उपस्थितीत ही निवड पार पडली. यावेळी प्रत्येक पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी संदीप भोसले यांनी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. नगरपंचायतीच्या नियोजन समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष अरविंद भोसले यांची पदसिद्द अध्यक्ष म्हणून निवड झाल्याचे घोषित केले.
नगरपंचायतचे गटनेते ज्ञानेश्वर नागरे, मावळते सभापती अॅड. शरद भामरे, स्वाती बेडसे, नाफिसाबी शेख अकबर, नगरसेवक अॅड. पूनम काकुस्ते, रत्ना भिल, गणोश सूर्यवंशी, प्रमोद येवले, हरीश भोसले, मनोज रामोळे, शेख अकबर शेख फत्तू आदी यावेळी उपस्थित होते. विजय भोसले रांनी सूत्रसंचालन केले. अॅड. शरद भामरे यांनी आभार मानले.