परिसरात लावली आग ; पोलिसांची माहिती…
सीपीएमच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप केला जात असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. तसेच हा हल्ला काही समाजकंटकाकडून करण्यात आला असल्याचं बोललं जात आहे.
आगरतळा: त्रिपुरात काही समाजकंटकांनी माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ला केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांच्या वडिलोपोर्जित घरावर हल्ला करण्यात आला आहे. गोमती जिल्ह्यातील उदयपूरच्या जमजुरी येथे देब यांचं घर असून या घरावर काही लोकांनी हल्ला केला. घरावर दगडफेक केल्यानंतर खिडक्यांच्या काचा फोडल्या. त्यानंतर घराला आग लावली. त्यानंतर आजूबाजूंच्या घरांनाही आग लावत दुकानेही पेटवून दिली. त्यामुळे या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सीपीएमच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप केला जात असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. तसेच हा हल्ला काही समाजकंटकाकडून करण्यात आला असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, बिप्लब देवब यांचे वडील दिवंगत हिरुधन देब यांच्या पुण्यतिथी निमित्ताने राज्यातील आणि राज्याबाहेरच्या संतांच्या उपस्थितीत पूजा होणार होती. त्याची तयारी सुरू होती. त्याचवेळी काही समाजकंटकांनी हा हल्ला केला. एका विशिष्ट समुदायाने देब यांच्या घराबाहेरची गाडी आणि बाईकवर हल्ला करून आग लावली. त्यानंतर तोडफड तसेच आजूबाजूच्या दुकानाना आग लावण्यात आली. त्यामुळं परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
आज 4 जानेवारी रोजी बिप्लब देब यांच्या वडिलांची पुण्यतिथी आहे. त्यामुळे देब हे आपल्या घरात हवन करणार होते. पुण्यतिथीच्या एक दिवस आधीच त्यांच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे. यामागे सीपीएमचं षडयंत्र असल्याचं सांगितलं जात असून, विशिष्ट समुदायाच्या लोकांनी हा हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे. माकपाच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले आमदार रतन भौमिक यांनी मंगळवारी या परिसरात एक बैठक घेतली होती. त्यानंतर संध्याकाळी हा हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. तसेच आग कोणी लावली याचा पोलीस तपास करताहेत.