मुंबई- ठाकरे गटाचे नेते आणि माजी परिवहनमंत्री अनिल परब यांची १० कोटी २० लाखांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. पैशांच्या अफरातफरी प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याची माहिती ईडीनं दिलीय. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. ही जप्त करण्यात आलेली मालमत्ता ही जमिनीच्या रुपात आहे, साधारणपणे ४२ गुंठे जागा जप्त करण्यात आली आहे. या जागेची किंमत २ कोटी ७३ लाख ९१ हजार इतकी आहे. तर याच जागेत बांधण्यात आलेलं साई रिसॉर्टही ईडीनं ताब्यात घेतलं आहे. या रिसॉर्टची किंमत ७ कोटी ४६ लाख ४७ हजार इतकी आहे.
Now ED action against #AnilParab
ED attached #SaiResort & other Properties of Anil Parab
Anil Parab ka Hisab Pura Kiya Jayega @BJP4India @Dev_Fadnavis @mieknathshinde pic.twitter.com/1yQlF8DbkS
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 4, 2023
भाजपाचे नेते किरिट सोमय्या यांनी या प्रकरणात सातत्यानं पाठपुरावा केला होता. साई रिसॉर्टवर हातोडा पडेल, यासाठी सोमय्या प्रयत्नशील होते.