तनया सप्ताश्वा हिच्याकडे संघाचे नेतृत्व..!
पिंपरी :- अलिगढ येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मल्लखांब मुलींच्या स्पर्धेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संघ सहभागी होत आहे. या मल्लखांब मुली संघाचे नेतृत्व पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाची (पीसीईटी) विद्यार्थिनी तनया सप्ताश्वा हिच्याकडे सोपवण्यात आले आहे.
दि.२२ ते २५ जानेवारी २०२३ या कालावधीत अलिगढ येथील राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विश्वविद्यालय येथे या स्पर्धा होणार आहेत. तनया सप्ताश्वा हीच्या नेतृत्वाखालील संघ गुरुवारी सायंकाळी रेल्वेने अलीगडला रवाना झाला आहे.
गेली दोन वर्ष तनया ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मल्लखांब संघाची खेळाडू होती. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघाने अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मल्लखांब मुलींच्या स्पर्धेत रजत पदक मिळविले होते.
तनया सप्ताश्वा हीस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मल्लखांब संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल मिळाल्याबद्दल पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई व पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी तनया सप्ताश्वा हिचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.