मुंबई : महाराष्ट्राच्या शिंदे मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत राज्याचे अधिकृत राज्य गीत मिळाले. बैठकीत ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताला राज्य गीताचा दर्जा देण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 19 फेब्रुवारी 2023 पासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त करण्यात येणार आहे. या निर्णयाला सांस्कृतिक कार्य विभागाने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली.
विशेष म्हणजे, अमृत महोत्सव वर्षासाठी प्रत्येक राज्यात एक गाणे असावे, असा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार महाराष्ट्रातील तीन गाण्यांची निवड करण्यात आली. त्यापैकी ‘गर्जा महाराष्ट्र’ हे गाणे राज्य गीत म्हणून निवडले गेले.