भाजपने या निवडणुकीत थेट टिळक कुटुंबीयांना डावललं आहे. मुक्ता टिळक यांच्या निधनाने कसब्याची जागा रिक्त झाली होती. तर भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने चिंचवडची जागा रिक्त झाली होती. भाजपने चिंचवडमध्ये जगताप यांच्या पत्नीला तिकीट दिलं. पण कसब्यात टिळक कुटुंबीयांना डावललं. त्याऐवजी हेमंत रासणे यांना तिकीट दिलं. त्यामुळे मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच आता दवे यांनी आपली उमेदवारी जाहीर केल्याने या निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसणार असल्याचं सांगितलं जात आहे.
कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची घोषणा केली आहे. मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी भाजपने चिंचवडमधून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना तर कसबा पेठ मधून हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. कसब्याच्या उमेदवारीवरून हिंदू महासंघाने थेट भाजपलाच सुनावलं आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघासाठी हिंदू महासंघ या संघटनेने उमेदवारी दाखल करण्याचे निश्चित केले आहे. यासंबंधी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात संघटनेने म्हटले आहे की, खुल्या प्रवर्गाचा आवाज विधानसभेत पोहोचवण्याबरोबरच पुण्येश्वराला मुक्त करणे आणि स्वच्छ, सुरक्षित आणि सभ्य कसबा हेच आमचे ध्येय असणार आहे. वंदनीय शिवप्रभू, संभाजी राजे, श्रद्धेय वीर सावरकर, पू हेडगेवार गुरुजी आणि गोळवळकर गुरुजी यांना स्मरून, स्वर्गीय मुक्ताताईचा आशीर्वाद घेऊन मंगळवारी दुपारी उमेदवारी दाखल करण्यात येणार आहे.
आनंद दवे हे हिंदू महासंघाचे नेते आहेत. हिंदुत्ववादी नेते म्हणून त्यांची प्रतिमा आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीमुळे कसब्यात हिंदुत्ववादी मतांमध्ये फूट पडणार असल्याचं सांगितलं जात आहे.