नवी दिल्ली – बँक ऑफ इंडियाने प्रोबेशनरी ऑफिसरच्या 500 पदांची भरती केली आहे. या रिक्त जागा बँक ऑफ इंडियाने जनरल बँकिंग स्ट्रीममधील क्रेडिट ऑफिसर आणि स्पेशालिस्ट स्ट्रीममधील आयटी ऑफिसरसाठी प्रसिद्ध केल्या आहेत.इच्छुक आणि पात्र उमेदवार आज 11 फेब्रुवारी 2023 पासून अधिकृत वेबसाइट https://www.bankofindia.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात.अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 फेब्रुवारी 2023 आहे.
पोस्ट
क्रेडिट ऑफिसर- GBO – JMGS -I- 350 रिक्त पदांचा तपशील.350 पैकी 135 पदे अनारक्षित आहेत.53 अनुसूचित जातींसाठी, 30 अनुसूचित जमातीसाठी, 97 ओबीसीसाठी, 35 EWS साठी राखीव आहेत.
पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.
वयोमर्यादा – 20 ते 29 वर्षे
आयटी अधिकारी (विशेषज्ञ ) – 150 जागा.
150 पैकी 63 अनारक्षित आहेत.
23 अनुसूचित जाती, 10 अनुसूचित जमाती, 41 ओबीसी, 13 ईडब्ल्यूएससाठी राखीव आहेत.
पात्रता – 4 वर्षे अभियांत्रिकी पदवी
वयोमर्यादा – 20 ते 29 वर्षे
निवड – ऑनलाइन लेखी परीक्षा, गट चर्चा, मुलाखत.या तीन टप्प्यात मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता तयार केली जाईल.
लेखी परीक्षेत, इंग्रजी भाषा, तर्क आणि संगणक अभियोग्यता, सामान्य अर्थव्यवस्था/ बँकिंग जागरूकता, डेटा विश्लेषण आणि व्याख्या यांतून 200 गुणांचे 155 प्रश्न विचारले जातील. पेपर १८० मिनिटांचा असेल.
इंग्रजी वर्णनात्मक पेपर (पत्र लेखन आणि निबंध) 25 गुणांचा असेल. 30 मिनिटे दिली जातील.
कनिष्ठ व्यवस्थापन ग्रेड स्केल-I (JMGS I) – 36000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7-63840पे
अर्ज फी
जनरल, EWS, OBC – रु 850
SC, ST आणि दिव्यांग – रु 175





















