नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने सोमवारी पाच दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली. न्यायालयाने सिसोदिया यांना ४ मार्चपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.
याआधी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने सिसोदिया यांना अबकारी धोरणाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात न्यायालयात हजर केले होते. त्याचवेळी तपास यंत्रणेने सिसोदिया यांना विशेष न्यायाधीश एम.के. नागपाल यांना पाच दिवसांच्या कोठडीत ठेवण्याची विनंती केली. जी कोर्टाने मान्य केली आहे.