पिंपरी :- शिवसेना उपनेते, व महासंसदरत्न श्रीरंग बारणे यांची पुणे व मावळ लोकसभेसाठी संपर्कप्रमुख पदी निवड झाली. त्यानिमित्त पिंपरी युवासेनेकडून शिंदेशाही पगडी व तलवार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळेस शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, उपजिल्हा प्रमुख राजेश वाबळे, जिल्हा संघटिका शैलाताई पाचपुते, शिवसेना शहरप्रमुख, निलेश तरस, देहूरोड शहरप्रमुख राजू हगवणे, युवासेना शहरप्रमुख विश्वजित बारणे, माजी नगरसेवक प्रमोद कुटे, युवतीप्रमुख शर्वरी जळमकर, रवी ब्रम्हे, राजेंद्र तरस, माऊली जगताप, ऍड. मुकुंद ओव्हाळ, करण काळे, उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन पिंपरी युवा अधिकारी निलेश हाके यांनी केले होते.