पिंपरी :– पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त निगडी वाहतूक विभाग येथे महिला पोलीसांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजया कारंडे, पोलीस फ्रेंड्स वेलफेअरचे संस्थापक अध्यक्ष गजाननभाऊ चिंचवडे, युवक अध्यक्ष शुभम चिंचवडे, पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन लाड, उपाध्यक्ष कमलजित सिंग, सेक्रेटरी विनायक येवले, पिंपरी चिंचवड शहर महिला अध्यक्षा सरिता साने, महिला उपाध्यक्षा अनुजा कुमार, पुणे जिल्हा महिला उपाध्यक्षा शैलाताई निकम, कार्याध्यक्षा संगिताताई कदम,
पिंपरी विधानसभा महिला उपाध्यक्षा पुर्णिमाताई बोरदे, चिंचवड विधानसभा महिला उपाध्यक्षा अंजलीताई पाटील, खेड विधानसभा अध्यक्ष संग्राम लाड, चिंचवड विधानसभा सचिव राकेश सायकर, कार्याध्यक्ष प्रविण अन्नदाते, संत तुकाराम नगर विभाग अध्यक्ष केशव त्रिभुवन, उपाध्यक्ष अतुल सागवेकर आदि उपस्थित होते.





















