साक्री : येथील प्रचिती प्री प्रायमरी स्कूलमध्ये फूड डिश डेकोरेशन व आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी आनंद मेळाव्यातील दृश्याचे रांगोळीतून रेखाटन करण्यात आले होते. फलक लेखनातून विदूषक व आनंद मेळाव्यातील वस्तूंचे चित्र काढण्यात आले होते.
फूड डिश डेकोरेशन स्पर्धेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेत महिला पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या स्पर्धेसाठी अर्ध्या तासाचा कालावधी उपलब्ध करून देण्यात आला होता. या अर्ध्यातासात अधिकाधिक चांगल्या प्रकारे डिश सजावट करण्याचा प्रयत्न केला. त्यात पपईची बास्केट, फळांची रेल्वे, कारल्यापासून मगराची प्रतिकृती, मोदकापासून तिरंगा, केकची सजावट अशा प्रकारे डेकोरेशन करण्यात आले होते. या स्पर्धेत मनीषा चौधरी, सीमा कुलकर्णी, रोशनी सोनवणे, संध्या अहिरराव, उर्मिला खैरनार, वासंती देसले, मनीषा भामरे, रोशनी कांकरीया, साधना चालसे, जान्हवी सोनवणे, मीनल वाणी, आरती बागुल यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून निर्मला भामरे व भारती भामरे यांनी तयार केलेल्या डिशचे परिक्षण केले.
सांताने केक कापून विद्यार्थ्यांना चॉकलेट, भेटवस्तू दिल्या. समोसा, साबुदानावडा, पाणीपुरी, भेळ, पास्ता, पावभाजी कचोरी, अप्पे, हलवा, सँडविच, मठ्ठा, साबूदाणा चिवडा, फुगे अशा अनेक वस्तूंची व पदार्थांची विक्री या वेळी करण्यात आली. पालकांनी पदार्थांची खरेदी करून या पदार्थां आस्वाद घेतला.
प्राचार्य भारती पंजाबी, संयोजक वैभव सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. तसेच शिक्षिका सुनीता पाटील, वृषाली सोनवणे, प्रिती लाडे, श्वेता रौंदळे, वैशाली लाडे, भारती पवार, हर्षदा पाटील, पूनम पवार, जयश्री बेंद्रे, शिक्षकेतर कर्मचारी बंदिश खैरनार, भटू भामरे, दीपक अहिरे, गिरीश नेरकर, महेंद्र सोनवणे, शांताराम पगारे, शरद पवार, सुरेश भामरे, कल्पेश ससले, रंजना सुर्वे, कल्पना देसले यांनी सहकार्य केले.