पिंपळनेर : येथील प्रचिती प्री प्रायमरी स्कूलमध्ये नाताळनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आकर्षक रांगोळी काढण्यात आली. प्रमुख पाहुणे डॉ. अजय राऊत यांनी विद्यार्थ्यांना नाताळबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांसाठी विविध खेळांचे या वेळी आयोजन करण्यात आले होते. शाळेत आकर्षक सजावट करण्यात आली होती. शिक्षकांनीही या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.





















