चौफेर न्यूज – श्रध्देय पब्लिक स्कूलमध्ये ग्रॅज्युएशन डे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे संचालक प्रशांत पाटील सर उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मुलांना मेडल व सर्टिफिकेट देण्यात आले. सिनिअर के जी च्या वर्गशिक्षिका पूनम तांदळे यांनी प्रत्येक मुलांचे विशिष्ट गुण सांगत त्यांचे कौतुक केले. प्रशांत पाटील सरांनी मुलांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
ग्रॅज्युएशन डे कार्यक्रमात अल्का हाके, पूनम तांदळे, मोहिनी हुकरे, रुपाली पाटील, केया चॅटर्जी, अपूर्वा जगदाळे, रोहिनी कुराडे, अंजली कुमारी, चैताली बेंगळे, उमेश इथापे, सिद्धेश नाईक आदि शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
उपस्थित सर्व विद्यार्थी व कर्मचारी वर्ग यांनी सिनिअर केजी च्या मुलांचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले.