माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही नामदेव ढाके युवा मंचाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून गेल्या 10 वर्षांपासून रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे. पिंपरी सेरोलोजीकल इन्स्टिट्यूट ब्लड बँक यांच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात एकूण 72 रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. बिजलीनगर येथील संपर्क कार्यालय परिसरात शिबिर पार पडले. प्रसंगी, मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून श्री. नामदेव ढाके यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी, माजी नगरसेवक सुरेश भोईर, सामाजिक कार्यकर्ता शेखर चिंचवडे, उद्योजक मिलिंद चौधरी, भुसावळ पंचायत समिती माजी सभापती गोलू पाटील, पाचपांडे काका, शंकर पाटील, भगवान निकम, बिभीषण चौधरी, सचिन टेकळे, धीरज धाकड, प्रदीप पाटील, कुशल नेमाडे, प्रदीप नेहते, नवनाथ वाघमारे, संदीप महाजन, संदीप बढे, एकनाथ सरोदे, चंद्रकांत ढाके, कैलास रोटे, वसंत नारखेडे, हेमंत ढाके, संजय पाटील, रवींद्र ढाके, प्रदीप ढाके, कुणाल इंगळे, योगेश चीनावले, अरविंद महाजन, दिलीप ढाके, सचिन वाणी, राहुल पाचपांडे आदी उपस्थित होते.
बिजलीनगर येथील मातृसेवा सेवाभावी संस्थेच्या वृध्द व असहाय्य लोकांसाठी निवास सेवा केंद्र आणि मोनी बाबा आश्रमातील वृद्धांसाठी फळे वाटपाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी संस्थेचे संस्थापक सुहास गोडसे, संस्कृतीताई गोडसे, धनंजय आंबुस्कर, सागर दोरे, वैष्णव चव्हाण, साहिल शेख, बसुराज एडवे, श्री. मरगिर, के. एस.पवार आदी उपस्थित होते.