पिंपरी :- महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्व समितीच्या वतीने भक्ती शक्ती समुहशिल्पास व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील आग्रणी नेते, तसेच गीरणी कामगार चळवळीचे नेते, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या निगडी येथील पुर्णाकृती पुतळ्यास पिंपरी चिंचवड महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप व जयंती महोत्सव समिती अध्यक्ष संजय ससाणे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जेष्ठ नेते भाऊसाहेबजी आडागळे, संदीपान झोंबाडे, युवराजराव दाखले, पिंपरी चिंचवड महानगरपालिका जनसंपर्क मुख्यअधिकारी किरण गायकवाड, प्रफुल्ल पुराणिक, माजी नगरसेवक सचिन चिखले, रामदास कांबळे, सतिष भवाळ, जयंती महोत्सव समिती, सचिव सरपंच संदिप जाधव, स्वप्निल जाधव, शिवाजी साळवे, आण्णा कसबे, शाहीर बापु पवार, आसाराम कसबे, संजय धुतडमल, मयुर जाधव, सतिश आडागळे, गणेश साठे, विशाल कसबे, दत्तु चव्हाण, सविताताई आव्हाड, राजु आवळे, मयुर गायकवाड, रामेश्वर बावने, गणेश वाघमारे, अनिल गायकवाड, यांच्यासह जयंती महोत्सव समितीचे आजी माजी अध्यक्ष, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.