जळगाव : तालुक्यातील शिरसोली प्र. न. ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी मुद्स्सर पिंजारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच हिलाल भिल यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवड प्रक्रीया आज पार पडली.
यावेळी, ग्रामपंचायत सदस्य श्रावण ताडे, रामकृष्ण काटोले, शशिकांत अस्वार, गौतम खैरे, द्वारकाबाई बोबडे, सखुबाई पाटील, पुष्पलता सोनवणे, माजी सरपंच शेणफडू पाटील, सुभाष बारी, वासुदेव बोरसे, प्रणय सोनवणे, भगवान बोबडे, मिठाराम पाटील, घनश्याम काटोले, नाना हवालदार, नामदेव पाटील, उमाजी पानगळे, उत्तम अस्वार, बापु भिल, बशीर पिंजारी, रउफ पिंजारी, नाना महाजन, दस्तगिर पिंजारी, महमूद पिंजारी, सईद पिंजारी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
शिरसोली गावात एकतेच्या भावनेतून गावाचा कारभार चालत असल्याने विकासाला कुठलीही बाधा येत नाही. सर्व ग्रामपंचायत सदस्य गावाच्या विकासासाठी तत्पर असून तालुक्यात गाव पहिल्या क्रमांकाची कामगीरी बजावत आहे. उपसरपंच पदाच्या कालावधीत गावाच्या विकासासाठी अधिक गतीने प्रयत्न करणार असल्याचे मत नवनियुक्त उपसरपंच श्री.पिंजारी यांनी व्यक्त केले.