श्री. प्रशांत भीमराव पाटील सर यांनी केले शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक…..
चौफेर न्यूज – साक्री तालुक्यातील सीबीएसई मान्यता प्राप्त प्रचिती इंटरनॅशनल स्कूलचा सलग पाचव्या वर्षी शंभर टक्के निकाल लागला . यामध्ये करिष्मा पाटील हिने 96% गुण मिळवत साक्री तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकविला .
तर युगंधरा देसले 94% प्राप्त करून दुसरा व हेमांगी शिंदे या विद्यार्थिनीने 93% मिळवत तिसरा क्रमांक मिळविला .तसेच सपना यादव 91% मितेश टाटिया 91% ,तेजल सोनवणे 91%, राजवर्धन सोनवणे 90% गुण मिळवून या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले . 32 विद्यार्थ्यांनी 80% पेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला.स्कूल मधील एकूण 53 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या गुणांनी यश संपादन करून शाळेस नावलौकिक मिळवून दिले आहे. या निकालाप्रसंगी संस्थेचे चेअरमन मा. श्री. प्रशांत भीमराव पाटील सर, प्राचार्या सौ .वैशाली लाडे मॅम , शाळेचे व्यवस्थापक श्री तुषार देवरे सर , श्री .वैभव सोनवणे सर , श्री . राहुल अहिरे सर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. साक्री तालुक्यामध्ये सीबीएसई पॅटर्न राबवणारी प्रचिती इंटरनॅशनल स्कूल एकमेव शाळा आहे. शासनाची ध्येयधोरणे शाळेकडून पाळले जातात . मुलांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या कलागुणांना चालना देण्याचे काम शाळेमार्फत केले जाते. शासनामार्फत आयोजित क्रीडा स्पर्धा असो अथवा शालेय अंतर्गत स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग करून घेण्यात येथील शिक्षक नेहमीच पुढाकार घेतात. त्यामुळे बौद्धिक ज्ञानासह मुलांना खेळामध्ये प्राविण्य मिळविण्यात मदत होते. शाळेचा 100% निकाल लागल्याचा आनंद आहे . अशी प्रतिक्रिया व्यक्त करत प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे चेअरमन मा. श्री. प्रशांत पाटील सर यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले. स्कूलमध्ये शिक्षण व्यवस्था उत्तम स्वरूपाची आहे . येथील शिक्षक वर्गाकडे विद्येचा भांडार असल्याने मुलांना आकलन होण्यास सोपे जाते .शाळेचे व्यवस्थापन उत्तमरीत्या आपली जबाबदारी पार पाडत असून एकाही विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेण्यात येत असते. असे म्हणत निकाल जाहीर झाल्यानंतर प्राचार्या वैशाली लाडे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले . विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल .शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे मॅम ,व्यवस्थापक श्री तुषार देवरे सर , श्री. वैभव सोनवणे सर, शिक्षक वर्ग व कर्मचारी वर्गाने विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले ..