भोसरी विधानसभा मधील अकरा प्रभागांच्या गुरुवारी मुलाखती
पिंपरी (दि. 04 जानेवारी 2017) फेब्रुवारी महिन्यात होणा-या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टी कडून उमेदवारी मिळवू इच्छिणा-यांच्या मुलाखतीचे वेळापत्रक पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्रसिध्दीस दिले आहे.
त्यानुसार भोसरी विधानसभा मतदार संघात येणा-या एकूण अकरा प्रभागातील इच्छुकांच्या मुलाखती गुरुवारी (दि. 5 जानेवारी) सकाळी नऊ वाजल्यापासून संत ज्ञानेश्वर मंगल कार्यालय भोसरी येथे घेण्यात येणार आहे. या वेळी कार्ड कमिटीचे सदस्य पालकमंत्री गिरीष बापट, शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अनिल शिरोळे, खासदार अमर साबळे, लोकलेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, आमदार महेश लांडगे, प्रदेश भाजपा सचिव उमा खापरे, प्रदेश सदस्य सदाशिव खाडे, एकनाथ पवार, संघटन सरचिटणीस माऊली थोरात, बाबू नायर, प्रमोद निसळ, सारंग कामतेकर, संजय मंगोडेकर, अमोल थोरात, प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी, राजेश पिल्ले, ॲड. अमर मुलचंदानी, वसंत वाणी, युवा मोर्चा शहराध्यक्ष रवी लांडगे, महिला मोर्चा शहराध्यक्षा शैला मोळक, अनुसूचित जाती जमाती शहराध्यक्ष मनोज तोरडमल आदी उपस्थित राहणार आहेत.
मुलाखतीचे वेळापत्रक पुढील प्रमाणे : प्रभाग क्र. पाच (गवळीनगर / चक्रपाणी) सकाळी नऊ वाजता ; प्रभाग क्र. तेरा (निगडी / यमुनानगर) सकाळी दहा वाजता ; प्रभाग क्र. 1 (तळेगाव / चिखली) दुपारी अकरा वाजता ; प्रभाग क्र. दोन (जाधववाडी / मोशी) दुपारी साडेबारा वाजता ; प्रभाग क्र. तीन ( मोशी / च-होली) दुपारी दीड वाजता ; प्रभाग क्र. चार (दिघी / बोपखेल) दुपारी तीन वाजता ; प्रभाग क्र. सहा (सदगुरुनगर / धावडे वस्ती) दुपारी साडेचार वाजता ; प्रभाग क्र. सात (भोसरी गावठाण / लांडेवाडी ) सायंकाळी साडेपाच वाजता ; प्रभाग क्र. आठ (इंद्रायणीनगर / बालाजी नगर) सायंकाळी सात वाजता ; प्रभाग क्र. अकरा (कृष्णा / कोयना / अजंठा) रात्री आठ वाजता ; प्रभाग क्र. बारा वाजता (रुपीनगर / त्रिवेणीनगर) रात्री साडेनऊ वाजता.
भाजपाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम जाहीर
























