टाळावू पासून टिकावू राख्यांनी वेधले सर्वांचे लक्ष
पिंपळनेर : प्रचिती पब्लिक स्कुल, पिंपळनेर येथे शाळेतील चिमुकल्यांचा रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. शाळेच्या प्रांगणात सरस्वती पूजनाने या कार्यक्रमाची सूरूवात झाली. यावेळी, मुख्याध्यापिका अनिता पाटील, समन्वयक राहुल अहिरे आदी उपस्थित होते. रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाप्रसंगी भाऊ आणि बहिणीतील उत्साह अतिशय विलक्षणीय होता.
विद्यार्थी अतिशय सुंदर, रंगीबेरंगी वेशभुषेत कार्यक्रमात सहभागी झाले होते. बहिण भावाचे नाते घटट करणारी राखी बांधण्याचा कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात पार पडला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या डांस व गितांनी कार्यक्रमात रंगत आणली. शिक्षिका कल्याणी काकुस्ते यांनी सुत्रसंचलन केले. काजल राजपूत, मंगला बहिरम यांनी रक्षाबंधन या सणाचे महत्त्व पटवून दिले. मुख्याध्यापिका अनिता पाटील यांनी रक्षा बंधनाचे महत्व सांगितले. कार्यक्रमासाठी सुंदर असे फलक लेखन व रंगोळी रेखाटण्यात आले होते.
आपले सर्वांचे रक्षणकर्ते पोलिस अधिकारी यांना देखिल राखी बांधण्याचा कार्यक्रम यावेळी पार पडला. तसेच रक्षाबंधनाच्या निमीत्ताने ३ ते ७ वी च्या विद्यार्थ्यासाठी टाकावू पासुन टिकावू राखी बनविण्याची स्पर्धा आयोजीत करण्यात आली. या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. कार्यक्रम संयोजनासाठी शाळेच्या सर्व शिक्षीका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.