साक्री : प्रचिती इंटरनॅशनल स्कूल मध्ये रक्षाबंधनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सर्वप्रथम शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे यांच्याहस्ते सरस्वती प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी, व्यवस्थापक तुषार देवरे, वैभव सोनवणे, कार्यक्रमाच्या संयोजक गीतांजली काकुस्ते, रवींद्र सोनवणे आदी उपस्थित होते.
इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनी कुमारी अनुष्का वाणी, अविज्ञा पवार या विद्यार्थीनींनी बहिण भावाच्या अतूट प्रेमाचे प्रतीक म्हणजे रक्षाबंधन असल्याचे सांगीतले. रक्षाबंधन हा भारतातील लोकप्रिय सण आहे. हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. या सणाला राखी पौर्णिमा किंवा नारळी पौर्णिमा असेही म्हटले जाते, असे विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी देवेश्री गांगुर्डे (आठवी) या विद्यार्थिनीने बहीण भावाच्या अतूट प्रेमाची महंती सांगणारी कविता सादर केली. रोहित काकुस्ते (चौथी ब) परिणीता खैरनार (चौथी ब ) ज्ञानदा पवार, कृतिका नांद्रे, स्वरा सावंत (दुसरी) या विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन म्हणजे बहिण भावाच्या पवित्र बंधनाचा सण आहे. रक्षा म्हणजे रक्षण व बंधन म्हणजे धागा रक्षणाचा पवित्र धागा म्हणजेच रक्षाबंधन असे सांगितले. तसेच शाळेच्या अध्यापिका स्नेहा पाटील यांनी माहिती दिल. रक्षाबंधन या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधते व त्याच्या सुख, समृद्धी व दीर्घायुष्यासाठी ईश्वरा जवळ प्रार्थना करते. तसेच भाऊ तिला बहिणीला तिच्या रक्षणाचे वचन देतो, भेट वस्तू ही देतो. घरोघरी गोड पदार्थ बनविले जातात व बहिण भावाला गोड पदार्थ खाऊ घालते असे त्यांनी सांगितले. जितेंद्र राजपूत यांनी श्रीकृष्णाने द्रौपदीचे वस्त्रहरण करण्यापासून कसे रक्षण केले.
याविषयी कथा सांगितली. इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी “ओ भैय्या रे ” या गाण्यावर नृत्य सादर केले. याचे मार्गदर्शन कोमल बागले यांनी केले. तसेच याप्रसंगी साक्री पोलीस स्टेशन येथे जाऊन पोलिसांना व सरकारी कर्मचाऱ्यांना शाळेच्या विद्यार्थ्यांनी राखी बांधली. तसेच देशाच्या सैनिकांना देखील कुरिअरद्वारे राख्या पाठविल्या जातात. रक्षाबंधनानिमित्त नर्सरी ते बारावीपर्यंत राखी बनविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. प्रत्येक वर्गानुसार आपापल्या वर्गातील मुलांना मुलींनी राख्या बांधल्या व मुलांनी देखील मुलींना भेटवस्तू दिल्या.
या कार्यक्रमासाठी सुंदर फलक लेखन व रांगोळीचे रेखाटन करण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या शिक्षिका यांनी देखील शिक्षक वर्गास व वाहन चालक वर्गास राख्या बांधून रक्षाबंधन साजरा केला. शाळेचे संस्थापक प्रशांत भीमराव पाटील यांनी सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे यांनी रक्षाबंधन हा सण भारतीय सभ्यतेचे व संस्कृतीचे प्रतीक आहे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संयोजन गीतांजली काकुस्ते, रवींद्र सोनवणे यांनी केले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी वर्ग व शिक्षक वर्ग, इतर कर्मचारी वर्ग, वाहन चालक वर्ग उपस्थित होते.