प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये “ब्लू डे” साजरा
पिंपळनेर : प्रचिती पब्लिक स्कूल पिंपळनेर येथे
‘ब्लू डे’ कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी,
नीळा रंग विश्वास, निष्ठा, ज्ञान, आत्मविश्वास, बुद्धिमत्ता आणि सत्याचे प्रतीक मानले जाते, असे मत शाळेचे समन्वयक राहुल पाटील, मुख्याधिपिका अनिता पाटील यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमावेळी, विद्यार्थ्यांनी छान असे ब्लू रंगांचे कपड़े परिधान केले. त्याचबरोबर ‘ब्लू-रंगाच्या वेगवेगळ्या वस्तूंचे प्रदर्शन लावण्यात आले. यामध्ये, विद्यार्थ्यांनी ब्लू रंगाची छत्री, मासा, कार्टुन, आकाश, ढग, फुलपाखरु, पाणीचे थेंब, नाव यासह बोटल, कंपास, पेन, ब्लु रंगाचे फुग्गा, चेंडु, खेळणी इत्यादी वस्तु तयार करून आणल्या. आरव काकुस्ते याने पाण्याच्या थेंबाची भुमिका साकारुन पाण्याचे महत्व पटवून दिले. मुलांनी नृत्य सादर करून उत्साह साजरा केेला. कार्यक्रमासाठी सुंदर असे फलक लेखन करण्यात आले. तसेच, रांगोळी रेखाटण्यात आली. कायक्रमाचे सुत्रसंचालन कल्याणी काकुस्ते यांनी केले. “ब्लू डे” विषयीची माहिती सरिता आहिरे यांनी दिली. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.