साक्री : प्रचिती इंटरनॅशनल स्कूल येथे विजयादशमी निमीत्त अहंकार, द्वेष-मत्सर, तिरस्कार करणाऱ्या अवगुणांचा नाश होण्यासाठी रावणाचे दहन करण्यात आले. दसरा सणानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वतीच्या प्रतिमा पूजन शाळेचे अध्यक्ष प्रशांत पाटील, शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे, शाळा व्यवस्थापक वैभव सोनवणे, तुषार देवरे यांच्या हस्ते झाले. दसरा हा सण भारतातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक सण मानला जातो. या दिवशी श्रीरामाने रावणाचा वध केला. म्हणून ‘दसरा’ या सणाला “विजयादशमी” असे म्हटले जाते. रामरूपी प्रेम, दया, करुणा, संयम, मानवता, धर्म हे सद्गुण माणसांमध्ये असावेत, असा संदेश यानिमीत्त दिला जातो, असे मौलिक मार्गदर्शन जितेंद्र राजपूत, गणेश नांद्रे यांनी केले.
भगवान राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या वेशभूषेतील लहान बालकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. कार्यक्रमाच्या शेवटी दांडीयाच्या वेशभूषेत आलेल्या शालेय विद्यार्थ्यांनी सुंदर असे दांडिया नृत्य सादर केले. तसेच नवदुर्गेच्या वेशभूषा साकारून विद्यार्थिनींनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी बाल श्री रामाने रावण दहन करून कार्यक्रमाची सांगता झाली. तसेच, प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी वहीवर सरस्वतीमातेचे सुंदर असे रेखाटन करून पूजन केले. या कार्यक्रमाचे व्यवस्थापन मनीषा बोरसे यांनी केले. तर सूत्रसंचालन कुणाल पानपाटील यांनी केले.