चौफेर न्यूज – संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना एकवीरा फाउंडेशनतर्फे अन्नदान करण्यात आले. या उपक्रमाचे फाउंडेशनतर्फे दरवर्षी आयोजन केले जाते. यंदाच्या वर्षी साबुदाणा खिचडी, चहा-बिस्कीट व राजगिऱ्याचे लाडूंचे वाटप करण्यात आले. या वेळी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत पाटील, गणेश गोरे, गणेश भिंगारे, प्रदीप सोनजे, हिरालाल पटेल, विश्वास फापाळे, अविनाश भालेकर, संघदीप सोनवणे, प्रवीण ठोके, शक्ती शिरसाठ, अतुल काळोखे, शाहरुख शेख, राजेश ठाकूर, अमित शिवणकर, बाळू अडागळे, संपत अडागळे, सुमीत कोंडे, दीपक गोरिवले, विजय लोंढे, राहुल बोराडे, अविनाश शिंदे, रमेश दातखिळे, बजरंग केसरकर उपस्थित होते. फ्रेंड्स ग्रुप व आई एकवीरा फाउंडेशनने उपक्रमाचे संयोजन केले.