पिंपरी : राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका एकाचवेळी असल्याने निवडणुकीच्या कामासाठी महापालिकांनाही निवडणुकांच्या कामासाठी कर्मच्याऱ्यांची शोधा-शोध सुरू झाली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कामासाठीही सुमारे 10 हजार कर्मच्या-यांची आवश्यकता असून, महापालिकेचे साडेसात हजार कर्मचारी असून अडीच हजार कर्मचारी आणखी लागणार आहेत. दि.11 जानेवारीपासून आचारसंहिता सुरू झाली आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
मात्र, यावेळी जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या निवडणुका असल्याने प्रशासनाच्या वतीने कर्मचा-यांची शोधा-शोध सुरू आहे. शहरात शासकीय व निमशासकीय, असे 350 कार्यालयातील कर्मचारी व खासगी परंतू, मान्यता प्राप्त शाळांमधील शिक्षकही निवडणूक कामासाठी घ्यावे लागण्याची शक्यता आहे.