प्रचिती इंटरनॅशनल स्कूल,साक्री येथे ” प्रचिती पाटील ” हिचा १७ वा वाढदिवस आनंदात साजरा
साक्री : प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कावठे, साक्री या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांची ज्येष्ठ कन्या प्रचिती प्रशांत पाटील हिचा १७ वा वाढदिवसाचे मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे, उपप्राचार्य घनश्याम सोनवणे, शाळा समन्वयक वैभव सोनवणे, तुषार देवरे यांच्यासह सर्व शिक्षकांनी कावठे गावाला भेट देऊन तेथील गोरगरीब बांधवांना आमंत्रित करून फरसाण, केकचे वाटप केले. वाढदिवसदिनी लोक पार्टी, जल्लोष करून अनाठाही पैसे खर्च करण्यावर अधिक भर देतात. परंतु प्रचिती इंटरनॅशनल स्कूलतर्फे हा कार्यक्रम अतिशय आगळावेगळा पध्दतीने आयोजित करण्यात आला. गोरगरिबांच्या चेहऱ्यावर हास्य आणि समाधान देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर साक्री शहरातील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन तेथील रुग्णांना केळी, सफरचंद, संत्री, चिकू फळाचे वाटप करण्यात आले. यावेळी रुग्णांनी फळांचा स्वीकार करत असतांना प्रचिती पाटील हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शाळेत देखील वाढदिवसाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमांमध्ये सर्वप्रथम शाळेच्या प्राचार्य वैशाली लाडे, सहशिक्षिका कांचन अहिरराव, हेमांगी बोरसे, सुनीता पाटील, तेजस्विनी घरटे यांनी दीपप्रज्वलन करून प्रचिती प्रशांत पाटील हिचे औक्षण केले. दीप म्हणजे मांगल्याचे प्रतीक आणि दीपज्योती म्हणजे ज्योतिर्गमय लक्ष्मी अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी ज्योत मग ती कोणत्याही प्रसंगी प्रज्वलित झालेली असली तरी ती सदैव सौख्याचा, आत्मशोधाचा मार्ग दाखवते. सर्वत्र तेज, सौंदर्य, आनंद आणि प्रसन्नता निर्माण करते. त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीत दिव्याला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. अशा या मंगल दीपज्योतीने प्रचिती पाटील चे औक्षण करण्यात आले. त्यानंतर वाढदिवसाचा “केक” कापण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतांना जितेंद्र राजपूत यांनी प्रचिती या शब्दाची ओळख करून दिली. प्रचिती म्हणजे जाणीव होणे. लक्षात येणे. अनुभव होणे आणि अनुभव म्हणजेच ज्ञान होणे असा अर्थ सांगितला. आणि या जगामध्ये अनुभवाहून कोणीही मोठं नाही. भारतीय संस्कृतीत प्रचिती हे नाव मुलीचे असते. आणि याच शुभनामाचा स्वीकार करून प्रशांत पाटील सर व कविता पाटील यांनी आपल्या ज्येष्ठ सुकन्येचे नाव “प्रचिती “असे ठेवले. प्रचिती या नावाचा ज्योतिष शुभांक ३ असून तिची रास कन्या रास मानली जाते. कन्या रास मधून जन्माला येणाऱ्या प्रचिती नावाच्या मुली सामाजिक आणि कलात्मक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करत असतात. भविष्यामध्ये सदैव आपलं नाव सुप्रसिद्ध ठेवत असतात असे मत त्यांनी व्यक्त केले. वाढदिवस हा सर्वांच्या आयुष्यातील दरवर्षी येणारा खास महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस होय ईश्वराने बहाल केलेली सुंदर पहाट, सुंदर दिवस होय. एक- एका दिवसाने वर्षाने आयुष्य वाढत जाते असे म्हणतात. परंतु आयुष्य किती जगावे यापेक्षा मिळालेले आयुष्य कसे जगावे हे ज्याला कळाले त्यांनी आयुष्य कमावले मनाने देहाने आणि वाचेने मांगल्य जपणे व इंद्रियांवर नियंत्रण ठेवणे आणि मर्यादा सांभाळणे ज्याला जमते तो खऱ्या अर्थाने आयुष्य जगतो. अशा पद्धतीने वर्षाचे ३६५ दिवस, महिन्याचे ३० ते ३१ दिवस, आठवड्याचे ७ दिवस आणि प्रचिती शाळेतील सर्वांचा आवडता दिवस म्हणजे प्रचिती पाटीलचा वाढदिवस होय, असं सांगून त्यांनी “नवागंध नवा आनंद निर्माण करीत.
प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी,नव्या वैभवांनी आनंद शतगुणी व्हावा. या सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रचिती पाटील हिला जितेंद्र राजपूत यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या. त्यानंतर शाळेच्या प्राचार्य वैशाली लाडे व उपप्राचार्य घनश्याम सोनवणे, समन्वयक वैभव सोनवणे, तुषार देवरे आणि सर्व शिक्षक- शिक्षिका आणि विद्यार्थी विद्यार्थिनी आणि सहकर्मचाऱ्यांनी प्रचितीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच, पुढील जीवन सुखाचं, समृद्धीचं, आनंदीच भरभराटीच आणि सुख समाधानाचं व इच्छा दिशा सफल करणार असावं, अशा शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र राजपूत यांनी केले. तर या कार्यक्रमाचे संयोजन स्मिता नेरकर आणि नीतू पंजाबी यांनी केले. उत्तम सजावट किरण गवळी, भू्पेंद्र साळुंखे, दिपमाला अहिरराव यांनी केली. उत्कृष्ट असा प्रचिती प्रशांत पाटील हिचा वाढदिवस मोठ्या आनंद उत्साहात पार पडला.