जीवनात यशस्वी होण्यासाठी शारीरिक क्षमता बळकट असावी लागते : सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागुल
प्रचिती इंटरनॅशनल स्कुलमध्ये वार्षिक क्रिडा महोत्सवात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
साक्री : प्रचिती इंटरनॅशनल स्कूल, साक्री येथे वार्षिक क्रिडा महोत्सव विविध स्पर्धांनी रंगला. नृत्याबरोबर विद्यार्थ्यांनी फुटबॉल, कुस्ती, हॉकी ,बास्केट बॉल या विविध खेळांची प्रत्यक्ष कृतीतून खेळाविषयी संदेश दिला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे साक्री शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागुल यांच्या हस्ते माता सरस्वती, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ व भारताचे राष्ट्रीय खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमांचे व क्रिडा साहित्याचे पूजन करण्यात आली. यावेळी, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील, प्राचार्या वैशाली लाडे, उपप्राचार्य घनश्याम सोनवणे, शाळा समन्वयक वैभव सोनवणे, तुषार देवरे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्याच्या स्वागत सत्कारानंतर विद्यार्थी प्रतिनिधी अनुश्री बदामे, विनित देवरे. येलो- हाऊसचे प्रमुख -निखिल देवरे, जान्हवी देवरे, ब्ल-ूहाऊसचे प्रमुख -दिक्षांत भदाणे, वेदिका बदामे, ग्रीन-हाऊसचे प्रमुख लोकेश भदाणे, देवेश्री गांगुर्डे, रेड-हाऊस प्रमुख-श्रेया कुवर, अजीश साळुंके या विद्यार्थ्यांनी क्रिडा ध्वजसंचलन करून क्रिडा प्रतिज्ञा घेण्यात आली. त्यानंतर इ.७ वी मधील विद्यार्थ्यांनी चक्क दे….चक्क दे…इंडिया या गाण्यावर सुंदर नृत्य सादर केले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागूल यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना क्रिडाविषयक मार्गदर्शन केले, ते म्हणाले कि, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्वत:ला सिद्ध करण्यासाठी शारिरीक क्षमता हि बळकट असावी लागते. ती खेळाच्या माध्यमातूनच घडविली जाते, असे त्यांनी सांगितले.
इ.नर्सरी ते इ.१० वी वर्गातील विद्यार्थ्यांच्या रनिंग, लींबू चमचा, क्रिकेट, बकेट बॉल, लगोरी, फुटबॉल, हॉकी इत्यादी विविध क्रिडा स्पर्धांना सुरूवात झाली.
लिंबू चमचा स्पर्धेत हेमांगी सूर्यवंशी प्रथम…
लींबू चमचा खेळात हेमांगी सुर्यवंशी (यू. के. जी.- डायमंड)हिने प्रथम क्रमांक पटकावला.व व्दितीय क्रमांक साईशा सोनवणे (यू. के. जी.)हिने पटकावला.तर तृतीय क्रमांक कार्तिकी जाधव(यू. के. जी.) हिने पटकावला हे पहिल्या दिवसाच्या खेळाचे विजेते ठरले.
सहाय्यक पोलीस निरिक्षक अनिल बागूल यांच्या हस्ते हेमांगी सुर्यवंशी हिला प्रथम बक्षीस सुवर्णपदक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. साईशा सोनवणे हिला प्राचार्य वैशाली लाडे यांनी द्वितीय बक्षीस रौप्यपदक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. तृतीय बक्षीस कार्तिकी जाधव हिला क्रिडा शिक्षक व शाळा समन्वयक वैभव सोनवणे व तुषार देवरे यांनी कास्यपदक व प्रमाणपत्र देऊन गौरविले.
विद्यार्थ्यांनी नोंदविला सहभाग…
३० डिसेंबर रोजी इ. नर्सरी ते १० वी.पर्यंतच्या विद्यार्थ्यासाठी प्रत्येक वर्ग शिक्षकांनी आयोजित केलेल्या खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या खेळांमध्ये बकेट बॉल, लिंबू चमचा, सुई दोरा, नेमबाजी, गोळा फेक, थाळी फेक, इत्यादी खेळ घेण्यात आले. या खेळामध्ये प्रत्येक वर्गातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
सांघिक खेळात विजयी वर्ग….
इ १ली. ते इ १० वी पर्यंत सांघिक खेळात खो-खो, कबड्डी, हँडबॉल चिली- पाटी, लगोरी, रिंग रेस, बेडूक -उडी, स्मायली बॉल क्रिकेट मॅच, बूट परिधान करणे. साथीदाराच्या वरून उडी मारणे. चेंडू समतोल, फुटबॉल, इत्यादी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले. या सांघिक खेळांमध्ये इ.१ली.-ब बेडूक उडी, इ.१ली.- क रिंग मधून जाणे. इ.२री -अ बूट परिधान करणे. इ.२री-ब साथीदाराच्या वरून उडी मारणे. इ. ३ री -अ बेडूक उडी इ. ३री-ब रिंग रेस इ. ४ थी. अ स्मायली बाँल क्रिकेट इ. ४ थी.चेंडू समतोल इ.५ वी.- अ फुटबॉल इ.५वी.- ब पायाखालून चेंडू टाकणे. इ.६वी.- अ कबड्डी व लगोरी इ. ७ वी क्रिकेट, लगोरी इ. ८ वी -अ कबड्डी इ. ८ वी- ब हँडबॉल, इ. ९ वी. चिलीपाटी इ.१०वी. क्रिकेट वरील वर्ग विजयी ठरले. सर्व वर्गातील विजेत्या संघांना चॅम्पियन चषक देऊन क्रीडा शिक्षक वैभव सोनवणे, कुणाल देवरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या वार्षिक क्रीडा महोत्सव कार्यक्रमाचे संयोजन क्रीडाशिक्षक वैभव सोनवणे, कुणाल देवरे, कार्यक्रमाचे संयोजक सपना देवरे, कुणाल पानपाटील यांनी केले. या कार्यक्रमात सुंदर सजावट रांगोळी व फलक लेखन किरण गवळी, दिपमाला अहिराव , वैष्णवी देवरे,भूपेंद्र साळुंखे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता नेरकर यांनी केले.
खेळासाठी पंच म्हणून क्रीडाशिक्षक वैभव सोनवणे, कुणाल देवरे यांनी काम पाहिले. शालेय क्रीडा महोत्सव स्पर्धांना मोठ्या आनंदा उत्साहात सुरुवात झाली. ३१ डिसेंबर२०२४ रोजी या वार्षिक क्रीडा महोत्सव स्पर्धांचा सांघिक खेळ खेळून समारोप करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी विविध खेळांमध्ये भाग घेऊन मोठ्या उत्साहात प्रतिसाद दर्शविला.