पिंपरी, दि. १८ जानेवारी २०१७ – प्रत्येक अधिका-याने वेळोवेळी होणा-या कायद्यातील बदलांचा अभ्यास करुन आपल्याला दिलेली जबाबदारी योग्यरितीने पार पाडावी अशा सूचना आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिल्या. पिंपरी चिचंवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ करीता नवीन नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व महापालिकेतील निवडणूक विभागाचे कक्ष प्रमुख यांची आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. आज दुपारी स्थायी समिती सभागृहात झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, सहाय्यक आयुक्त डॉ.यशवंतराव माने, मुख्य लेखापरिक्षक पदमश्री तळदेकर, मुख्यलेखापाल राजेश लांडे, सहाय्यक आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, डॉ. प्रवीण अष्टीकर, चंद्रकांत इंदलकर, योगेश कडूसकर, मनोज लोणकर, अण्णा बोदडे, आचारसंहिता कक्षप्रमुख सुरेश जाधव, निवडणूक निर्णय अधिकारी सोनाप्पा यमगर, पुरुषोत्तम जाधव, अण्णासाहेब चव्हाण, स्नेहल भोसले, मंजिरी मनोलकर, एम.आर. मिसकर, रुपाली आवले, संतोष देशमुख, स्नेहल बर्गे, संजिव देशमुख, वैशाली उंटवाल सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कदम, देवदत्त ठोंबरे, विजय यादव, पल्लवी धाडगे, प्रशांत आवटे, सुनिता आस्वले, टि.पी.दोरकर, अंजली मरोड, अमरदिप वाकडे, अर्चना तांबे, मोहिनी चव्हाण, कार्यकारी अभियंता सतीश इंगळे, प्रमोद ओंभासे आदी उपस्थित होते.